Namdev Gharal
पावसाळ्यात सापांच्या अधिवासात, बिळांमध्ये पाणी घुसते परिणामी त्यामुळे सापांना सुरक्षित ठिकाण शोधावे लागते आणि ते मानवी वस्तीच्या दिशेने सरकतात.
नैसर्गिक अधिसात पाणी गेल्यामुळे घरांची छपरे, अडगळ अशा कोरड्या ठिकाणी साप थांबण्याचा प्रयत्न करतो अशावेळी अनवधानाने तिथे गेल्यावर सर्पदंश होऊ शकतो
पावसाळ्यात शेतीकामे जास्त असतात, वैरण काढणे, रोपलागण करताना, भांगलण करताना सर्पदंशाचा धोका अधिक असतो.
पावसामुळे गवत, तण मोठ्या प्रमाणात उगवलेले, पाण्याने भरलेली शेती यामुळे साप दिसत नाहीत आणि चुकून त्यावर पाय पडतो.
साचलेल्या पाण्यामुळे बेडूक, उंदीर आदी प्राणी बाहेर पडल्यामुळे भक्ष्य पकडण्यासाठी सापांचा वावर वाढतो
पावसाळ्यात बऱ्याचवेळा लाइट जाते, अंधार अधिक असणे, आणि टॉर्चशिवाय फिरणे यामुळे साप चुकून पायाखाली येऊ शकतो.
बऱ्याचवेळा साप पावसापासून बचावासाठी गोठ्यांमध्ये, साठवलेल्या वैरणीमध्ये लपतात. जनावरांना सोडबांध करताना किंवा चारा देताना माणसे सापांच्या संपर्कात येतात.
सर्पदंश झाल्यास वेळेत उपचार मिळणे गरजेच असते, पावसाळ्यात रस्त्याची झालेली दुर्दशा होते. अशावेळी रुग्णास वेळेत उपचार न मिळाल्याने प्रकृती गंभीर होऊ शकते.