रात्री सतत झोपमोड का होते? जाणून घ्या कारणे...

पुढारी वृत्तसेवा

झोप मोडण्यामागे शारीरिकपासून ते मानसिक कारणांसह काही आजारही कारणीभूत असू शकतात.

वाढत्या वयोमानानुसार झोपेवर परिणाम होऊ शकतात.

मानसिक ताणतणावामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतात, यामुळे झोपमोड होते.

दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या औषधांमुळेही झोपेवर परिणाम होऊ शकतात.

सर्दी-खोकल्याची औषधे नैराश्य कमी करण्यासाठी सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही रात्रीची झोप मोड होऊ शकते.

यकृताची कार्यप्रणाली योग्य प्रकारे सुरू नसणे, हे देखील रात्री झोपमोड होण्यामागील कारण असू शकते.

संधिवात, नैराश्य, न्युरोपॅथी मेनोपॉज, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होणे, थायरॉइड ग्रंथींमुळे झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

रात्री झोप येत नसल्यास दीर्घ श्वास घ्यावा आणि मेडिटेशन करावे.