Saffron लाल सोनं : का आहे केशर जगातील सर्वात महागडा मसाला?

Namdev Gharal

काश्मिरमध्येच मिळणारे केशर हे रेड गोल्ड म्हणून ओळखले जाते. कारण एक किलो केशर साठी लाखो फुलामधुन याचे पुकेसर गोळा करावे लागतात, चांगल्या दर्जाच्या केशरचा दर ४ ते ६ लाख रुपये किलाे इतका जातो.

एका फुलातून फक्त ३ धागे: केशर हे 'क्रोकस सॅटिव्हस' (Crocus sativus) नावाच्या जांभळ्या रंगाच्या फुलापासून मिळते. या प्रत्येक फुलाच्या मध्यभागी केवळ ३ नाजूक लाल रंगाचे पुंकेसर असतात, ज्यांना आपण केशर म्हणतो.

हाताने काढणी: केशराच्या काढणीसाठी कोणत्याही यंत्राचा वापर करता येत नाही. प्रत्येक फूल पहाटे सूर्योदयापूर्वी हाताने तोडावे लागते आणि त्यातील नाजूक लाल धागे अत्यंत काळजीपूर्वक हातानेच वेगळे करावे लागतात.

१ किलो केशरासाठी दीड लाख फुले: अवघा १ किलो सुकवलेला केशर मिळवण्यासाठी तब्बल १,५०,००० ते २,००,००० फुलांची आवश्यकता असते. वजनाने हे धागे अत्यंत हलके असल्याने मोठ्या प्रमाणावर फुले गोळा करावी लागतात.

केशराची फुले वर्षातून फक्त एकदाच येतात. त्यांचा बहराचा काळ केवळ २ ते ३ आठवड्यांचा असतो. फुले उमलल्यानंतर ती कोमेजण्याआधी काही तासांतच तोडावी लागतात, अन्यथा त्यांचा दर्जा खालावतो.

हे पीक जगात मोजक्याच ठिकाणी येते. यासाठी विशिष्ट प्रकारची जमीन, थंड हवामान आणि कोरडी हवा लागते. इराणमध्ये जगातील सुमारे ९०% केशर पिकते; भारतात काश्मीरमधील पम्पोर भाग उच्च दर्जाच्या केशरासाठी प्रसिद्ध आहे.

Red Gold का म्हणतात?: सोन्याप्रमाणेच केशराचे वजन ग्रॅमवर ठरते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात याचा भाव ४ ते ६ लाख प्रति किलो असतो. याच्या सोन्यासारख्या प्रचंड मूल्यामुळे याला जगभरात 'रेड गोल्ड' म्हटले जाते.

सुकवल्यानंतर वजनात मोठी घट: फुलांतून ताजे धागे काढल्यानंतर ते विशिष्ट तापमानावर सुकवले जातात. सुकवण्याच्या प्रक्रियेत पाण्याचे प्रमाण उडून गेल्यामुळे ताज्या धाग्यांचे वजन ८०% पर्यंत कमी होते.

केशर मध्ये क्रोसिन (Crocin), सफ्रानल (Safranal) आणि पिक्रोक्रोसिन (Picrocrocin) हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक नैराश्य कमी करणे, स्मरणशक्ती सुधारणे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात.

सर्वाधिक मागणी आणि मर्यादित पुरवठा: मिठाई, सौंदर्यप्रसाधने, सुगंधी द्रव्ये आणि आयुर्वेदात केशराला जगभरातून मोठी मागणी आहे; मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे त्याचे दर नेहमीच उच्च राहतात.