पुढारी वृत्तसेवा
आपल्याकडे घरात शीळ घालणे चुकीचे मानले जाते. पण यामागे खरं कारण काय आहे? जाणून घ्या.
हिंदू धर्मात विनाकारण शीळ वाजवल्याने लक्ष्मी रूसते, अशी मान्यता आहे. यामुळे घरात दारिद्र्य येते असे मानले जाते.
जुन्या समजुतीनुसार, संध्याकाळी किंवा रात्री शीळ घातल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.
पूर्वीच्या काळी घरात शीळ वाजवणे हे उनाडपणाचे लक्षण मानले जात असे. सुसंस्कृतपणा टिकवण्यासाठी हा नियम होता.
पूर्वी चोरांना सावध करण्यासाठी किंवा संकेत देण्यासाठी शिळ घातली जायची. त्यामुळे रात्री शीळ घालणे हे धोक्याचे लक्षण समजले जायचे.
घरात आजारी व्यक्ती किंवा लहान बाळ असल्यास, शीळच्या आवाजाने त्यांची झोपमोड होऊन त्रास होऊ शकतो.
विज्ञानानुसार यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले जाते.
घरातील मंगलमय वातावरण आणि शिस्त राखणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे.