New Clock Timing | नवीन घड्याळाचे काटे १० वाजून १० मिनीटांवरच सेट केलेले का असतात?

Namdev Gharal

तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का कोणतेही नवीन घडाळ्याची जाहिरात पहा किंवा दुकानातीन नवीन घड्याळे पाहा यामध्ये काटे हे १० वाजून १० मिनिटे व ३५ सेकंद अशीच का वेळ दाखवतात

काय आहे यापाठिमागचे कारण अंधश्रद्धा की विज्ञान की इतर काही कारणे हे जाणून घेऊ

याचा विचार केला तर लक्षात येथे की यामागे कोणतंही अंधश्रद्धा किंवा रहस्य नसून, त्यामागे मार्केटिंग आणि मानसशास्त्रीय कारणं आहेत.

यामध्ये पहिले कारण आहे कंपनीचा लोगो स्पष्ट दिसणे बहुतांश घड्याळ कंपन्या आपला 'लोगो' (Logo) किंवा नाव घड्याळाच्या वरच्या भागात म्हणजेच १२ च्या अगदी खाली छापतात.

जर सुई १०:१० वर असेल, तर दोन्ही सुया लोगोच्या खाली राहतात आणि कंपनीचे नाव अगदी स्पष्ट आणि आकर्षकपणे दिसते.

दुसरी गोष्ट म्हणजे 'स्मायली' (Smiley) लूक: १० वाजून १० मिनिटांनी घड्याळाच्या दोन्ही सुयांची स्थिती ही एका हसऱ्या चेहऱ्यासारखी (Smile) दिसते.

मानसशास्त्रीयदृष्ट्या, हसरा चेहरा पाहिल्यावर ग्राहकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते, ज्यामुळे घड्याळ खरेदी करण्याची इच्छा वाढते. याउलट जर ८ वाजून २० मिनिटे दाखवली, तर तो चेहरा रडवल्यासारखा किंवा 'सॅड' दिसतो.

घड्याळात असणारी तारीख (Date) किंवा इतर लहान 'डायल' सहसा ३, ६ किंवा ९ आकड्यांच्या जवळ असतात. १०:१० या वेळेमुळे घड्याळाचे हे इतर फीचर्स काट्यांच्या आड झाकले जात नाहीत.

१० वाजून १० मिनिटांमुळे घड्याळाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक सुंदर संतुलन दिसते, जे डोळ्यांना दिसायला अतिशय सुबक आणि आकर्षक वाटते.

एक रंजक इतिहास: सुरुवातीच्या काळात (१९२०-१९३० च्या दशकात) कंपन्या ८ वाजून २० मिनिटे ही वेळ ठेवायच्या. पण त्यामुळे घड्याळाचा चेहरा 'उदास' किंवा 'नाराज' वाटायचा.

ग्राहकांवर याचा नकारात्मक प्रभाव पडू नये म्हणून नंतरच्या काळात सर्वच कंपन्यांनी जागतिक स्तरावर १०:१० ही वेळ प्रमाणित (Standard) म्हणून स्वीकारली.