Nasal Breathing Benefits: व्यायाम करताना तोंडाने नव्‍हे नाकातूनच श्वास का घ्यावा?

पुढारी वृत्तसेवा

आपल्या श्वसन यंत्रणेचा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे नाक. आपण प्रत्येकजण नाकानेच श्वास घेत असतो, परंतु काही वेळा आपण तोंडाने देखील श्वास घेत असतो.

Exercise

आपल्यातील अनेक जण धावताना किंवा चढण चढताना तोंडाने श्वास घेता. तेव्हा अनेकजण तोंडाने श्वास घेऊ नको, असा सल्ला देताना आपण ऐकले असेल.

Running | Pinterest

एका अभ्यासानुसार नाकातून श्वास घेणेच योग्य मानले जाते.

संशोधनानुसार, श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीचा रक्तदाब आणि हृदयाच्या गतीवर खूप परिणाम होतो. नाकातून श्वास घेताना मज्जासंस्था अधिक आरामदायक स्थितीत राहते.

श्वास नलिका नाक आणि तोंडापासून सुरू होते आणि श्वसननलिका आणि नंतर फुफ्फुसांमध्ये जाते, शरीरात ऑक्सिजनचा योग्य प्रवाह राखण्यास श्वसन नलिका मदत करते.

श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीचा तुमच्या रक्तदाब आणि हृदयाच्या गतीवर खूप परिणाम होतो.

तोंडाऐवजी नाकाने श्वास घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे या संशोधनात असे आढळून आले. त्यामुळे धावतात किंवा कसरत करताना बहुतेक तज्ज्ञांचे मते श्वास नाकातूनच घ्यावा.