Raw Mango Tamarind | कैरी किंवा चिंचेचे नाव काढले तरी तोंडाला पाणी का सुटते? ही आहे मेंदूची किमया

Namdev Gharal

आपण पाहतो की चिंच किंवा कैरी पाहिली किंवा कोणी तिचे नाव काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते असे का होते ते पाहू

आपल्या तोंडाला पाणी सुटण्यामागे जैविक व मानशास्त्रिय कारण आहे. ज्याला विज्ञानात 'कंडिशन्ड रिफ्लेक्स' (Conditioned Reflex) असे म्हटले जाते

जेव्हा आपण पहिल्यांदा चिंच खातो किंवा कैरी खातो, तेव्हा मीठ-तिखट लावून खाल्लेले असते आणि ती चव आपल्या मेंदूमध्ये साठवली जाते.

पुढच्या वेळी जेव्हा आपण चिंचेचे किंवा कैरीचे नाव ऐकतो, किंवा ती पाहतो त्‍यावेळी तेव्हा मेंदू त्या जुन्या अनुभवाला 'ट्रिगर' करतो.

आपला मेंदू आंबट चवीच्या बाबतीत खूप संवेदनशील असतो. कैरीचा किंवा चिंचेचा विचार केल्यावर मेंदूला होणारा 'आंबट' चवीचा भास लाळ ग्रंथींना वेगाने सक्रिय करतो.

कैरी आणि चिंच यांमध्ये नैसर्गिक आम्ल (Acid) असते. हे आम्ल दातांच्या आवरणाला इजा पोहोचवू शकते किंवा पोटातील ॲसिडिटी वाढवू शकते.

हे रोखण्यासाठी मेंदू लाळ ग्रंथींना (Salivary Glands) सक्रिय करतो. लाळ हे एक प्रकारचे अल्कलाईन म्हणून काम करते, जे कैरी-चिंचेच्या आंबटपणाला न्यूट्रलाईज करून पचन सुलभ करते.

त्‍यामुळे या आंबट फळांची नाव काढताच आपल्या मेंदूला असे वाटते की आता ही वस्तू प्रत्यक्षात खाल्ली जाणार आहे. त्यामुळे अन्नाचे स्वागत करण्यासाठी शरीर आगाऊ तयारी म्हणून तोंडात लाळ निर्माण करते.

ही लाळ सुटणे म्हणजेच आपण तोडांला पाणी सुटने असे म्हणतो. त्‍यामुळे या कैरी किंवा चिंच आपल्या मेंदूला लाळ तयार करण्यास प्रवृत्त करतात

तर एखाद्याला कैरी खाताना बघितल्यावरही आपल्या तोंडाला पाणी सुटते. याला विज्ञानात 'मिरर न्यूरॉन्स' (Mirror Neurons) ची किमया म्हणतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा अनुभव आपला मेंदू स्वतः अनुभवू लागतो.