White Colour Cars | बहुतांश Cars चा रंग पांढराच का? काय आहे कारण

Namdev Gharal

आपण रस्त्‍यावरुन जात असताना आपल्याला प्रकर्षाने जाणवते की आजूबाजूने ज्या चारचाकी जातात, यामध्ये कार्स, पिक वाहने, ॲम्ब्यूलन्स यांचा बहुतांश रंग हा पांढराच दिसतो

इतर रंगाची वाहने दिसतात पण प्रमाण पाहिले तर अनेक वाहनांसाठी पांढराच रंग वापरलेला दिसतो. यापाठिमागे काय विज्ञान आहे जाणून घेऊ

लोकांना पसंत आहे म्हणून हा रंग वाहनांना दिला जात नाही या रंगाच्या पाठीमागे खूप मोठे विज्ञान, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र दडलेले आहे.

विज्ञान सांगते की पांढरा रंग सूर्याच्या किरणांना आणि उष्णतेला सर्वाधिक परावर्तित (Reflect) करतो. पांढरी कार सूर्याची उष्णता शोषून घेत नाही, ज्यामुळे कडक उन्हातही गडद रंगांच्या कारपेक्षा तुलनेने कमी गरम होते.

केबिन कमी गरम झाल्यामुळे कारचे एसी (AC) जलद काम करते आणि इंधनाची (Fuel) बचत होते. इतर रंगाच्या कारमध्ये एसीला अधिक काम करावे लागते

दुसरे महत्‍वाचे काम म्हणजे व्हिजीबिलीटी रात्रीच्या वेळी आणि धुक्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या गाड्या इतर रंगांच्या गाड्यांपेक्षा सर्वात जास्त स्पष्ट आणि लांबूनही नजरेस पडतात. रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा धोका कमी होतो.

जर कारवर किरकोळ ओरखडे किंवा डेंट पडले, तर ते पांढऱ्या रंगावर इतर गडद रंगांच्या तुलनेत खूप कमी उठून दिसतात.

तसेच, हलकी धूळ किंवा वाळू पांढऱ्या रंगावर लवकर दिसून येत नाही, इतर कारवर खपू उठून दिसते. ज्यामुळे पांढरी गाडी सारखी सारखी साफ करावी लागत नाही.

जास्त रिसेल व्हल्यू, पांढरा रंग हा एक 'एव्हरग्रीन' रंग मानला जातो. तो कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही.

सेकंड हँड मार्केटमध्ये पांढऱ्या रंगाच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असते आणि त्यांची विक्रीही लवकर होते.

कार कंपन्यांसाठी पांढरा रंग तयार करणे आणि त्याचा बेस कोट लावणे इतर फॅन्सी रंगांच्या (उदा. मेटॅलिक किंवा मॅट फिनिश) तुलनेत स्वस्त पडते.

बऱ्याच कंपन्या पांढऱ्या रंगासाठी अतिरिक्त पैसे आकारत नाहीत, त्यामुळे ग्राहकांसाठीही हा किफायतशीर पर्याय ठरतो.

पांढरा रंग हा दिसायला साधा असला, तरी तो पैशांची बचत करणारा, सुरक्षितता देणारा आणि गाडीला थंड ठेवणारा 'स्मार्ट' रंग आहे.