पुढारी वृत्तसेवा
मद्यनिर्मिती व ओक झाडाचे लाकूड याचा खूप मोठा संबध आहे. वाईन विस्की उद्योगांमध्ये ओक लाकडापासून बनवलेले बॅरेल वापरले जाते, काय आहे यापाठीमागचे रजंक कारण जाणून घेऊ
युरोप अमेरिकेत प्रामुख्याने मद्य तयार करण्यासाठी ओक लाकडाच्या बॅरेलचीच निवड केली जाते हे बॅरेल बनवण्यासाठी किमान ८० ते १०० वर्षे (काही युरोपियन ओकच्या बाबतीत १२० ते १५० वर्षे) जुन्या झाडांचेच लाकूड वापरले जाते.
ओकचे झाड पुरेसे जुने आणि परिपक्व झाल्यावरच त्याच्या खोडातील फायबर्स दाट होतात. कोवळ्या झाडाचे लाकूड वापरल्यास दारू गळण्याची शक्यता असते,
ओक लाकडाचीच निवड का?
ओकचे लाकूड अत्यंत मजबूत आणि नैसर्गिकरीत्या सूक्ष्म छिद्रे (Porous) असणारे असते. यातून दारू बाहेर गळत नाही, पण आत सूक्ष्म प्रमाणात हवेची देवाणघेवाण सुरू राहते.
ओक लाकडामध्ये व्हॅनिलिन आणि नैसर्गिक साखर असते. दारू जसजशी लाकडाच्या संपर्कात मुरते, तशी तिला व्हॅनिला, नारळ आणि कॅरॅमेलची अप्रतिम चव मिळते.
बॅरेल तयार करताना ते आतून आगीवर भाजले जातात. यामुळे लाकडातील साखर कॅरॅमलाइज्ड होते आणि कोळशाचा थर दारूतील अशुद्ध घटक शोषून घेतो.
डिस्टिलेशननंतर मिळणारी व्हिस्की किंवा रम पाण्यासारखी पारदर्शक असते. ओक बॅरेलमध्ये वर्षानुवर्षे राहिल्यानंतर लाकडातील घटकांमुळेच तिला सोनेरी-तपकिरी रंग मिळतो.
एकदा एका मद्यासाठी (उदा. शेरी किंवा बोर्बन) वापरलेले बॅरेल नंतर स्कॉच व्हिस्की पिकवण्यासाठी पुन्हा वापरले जातात, ज्यामुळे आधीच्या मद्याचा सुवास नव्या मद्यात उतरतो.
बॅरेलमध्ये दारू मुरत असताना दरवर्षी सुमारे १ ते २ टक्के दारू लाकडाच्या सूक्ष्म छिद्रांतून बाष्पीभवन होऊन हवेत उडते. डिस्टिलरी जगतात या उडून गेलेल्या भागाला 'एंजल्स शेअर' (देवाचा वाटा) म्हणतात.
अशा लाकडाच्या बॅरेलमध्ये मद्याच्या प्रकारानुसार काही वर्षे दारु मुरवत ठेवली जाते, उदा स्कॉच २० ते २५ वर्षे इतकी, जितकी जास्त मुरलेली दारु तितकी तिची जास्त किंमत होते