पुढारी वृत्तसेवा
पुण्यात डीजेबंदीची मागणी
पुण्याच्या गणेशोत्सवात डीजेचा मुद्दा गाजतोय. ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज वाढतोय.
विद्यानंद बापट चर्चेत
नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट चर्चेत आहेत. त्यांनी डीजेबंदीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला.
बैठकीतून बाहेर काढलं
पुणे महापालिकेच्या पूर्वतयारी बैठकीत त्यांनी भूमिका मांडली. मात्र, त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आलं.
मूळचे रत्नागिरीचे
विद्यानंद बापट मूळचे रत्नागिरीचे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यात राहतात. नारायण पेठेत त्यांचं वास्तव्य आहे.
परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय
बापट विविध परिवर्तनवादी संघटनांमध्ये काम करतात. लोकहिताच्या मुद्द्यांवर ते आवाज उठवतात.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही सहभाग
डीजेबंदी हा त्यांचा एकमेव मुद्दा नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमांतही ते सहभागी होतात.
ध्वनी प्रदूषणाविरोधात लढा
धार्मिक सणांमधील ध्वनी प्रदूषणाला त्यांचा विरोध आहे. रहदारीला होणाऱ्या अडथळ्यांवरही ते प्रश्न उपस्थित करतात.
शिक्षण आणि नोकरी काय?
विद्यानंद बापट यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. सध्या ते खासगी कंपनीत नोकरी करतात. नोकरीसोबत सामाजिक कामही करत आहेत.
सरकारच्या तीन कार्यालयांशी पत्रव्यवहार
डीजेबंदीबाबत त्यांनी पुणे महापौर कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयालाही कळवलं. तिन्ही कार्यालयांकडून प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.