पुढारी वृत्तसेवा
आपल्या घरात प्लास्टिकच्या खुर्च्या अथवा स्टूल्स असतात. आपण सगळ्यांनी पाहिले असेल की या स्टूलच्या मध्यभागी एक छिद्र असते.
वर्षानुवर्षे आपण या स्टूल्सचा वापर करत आलो आहोत. पण हे छिद्र खरं तर का असतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
अनेकांना वाटतं असेल हे फक्त सजावटीसाठी केलेले डिझाईन आहे. पण प्रत्यक्षात या छिद्रामागे एक वैज्ञानिक कारण दडलेलं आहे.
सर्वात मोठं कारण म्हणजे स्टूल्स एकावर एक ठेवताना ‘व्हॅक्यूम’ तयार होऊ नये म्हणून.
जेव्हा तुम्ही अनेक प्लास्टिक स्टूल्स एकावर एक रचता, तेव्हा त्यांच्यामध्ये हवा अडकते.
ही हवा दबाव तयार करते आणि स्टूल्स एकमेकांना व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे चिकटतात. त्यामुळे त्यांना वेगळं करणे कठीण होतं.
पण मध्यभागी असलेलं हे छिद्र हवेला बाहेर जाण्याचा मार्ग देते.
दुसरे कारण म्हणजे प्लास्टिक स्टूल्स मोल्डिंग प्रक्रियेतून बनवले जातात, ज्यामध्ये गरम प्लास्टिक साच्यात ओतलं जातं.
या प्रक्रियेदरम्यान छिद्र फक्त हवा बाहेर काढण्यासाठीच मदत करत नाही, तर उत्पादन सोपं आणि कार्यक्षम बनवते.