Lift Mirrors reason: लिफ्टमध्ये आरसे कशासाठी असतात? खरं कारण

पुढारी वृत्तसेवा

फक्त चेहरा पाहण्यासाठी की यामागे आहे दुसरंच काही कारण? जाणून घ्या रंजक माहिती!

लिफ्टमध्ये शिरताच आपण लगेच आरशात पाहतो, केस नीट करतो किंवा सेल्फी काढतो. पण आरसा लावण्यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे.

बंद जागेची भीती घालवण्यासाठी

लिफ्ट चारही बाजूंनी बंद असते. काहींना यामुळे घुसमटल्यासारखे होते. आरशामुळे लिफ्ट मोठी आणि हवेशीर असल्याचा भास होतो, ज्यामुळे मनातील भीती कमी होते.

लक्ष विचलित करणे

उंच इमारतींमध्ये लिफ्टने वर-खाली जाण्यास वेळ लागतो. लोक आरशात स्वतःला पाहण्यात व्यस्त राहिल्यामुळे त्यांचा वेळ कसा जातो, हे त्यांना समजतच नाही.

सुरक्षितता

लिफ्टमध्ये अनोळखी लोक एकत्र प्रवास करतात. आरशामुळे आपल्या मागे किंवा शेजारी कोण काय करतंय, यावर सहज लक्ष ठेवता येतं. त्यामुळे चोरी किंवा गैरवर्तनाचा धोका कमी होतो.

दिव्यांगांसाठी मदत

लिफ्टमध्ये व्हीलचेअर वळवण्यासाठी पुरेशी जागा नसते. अशा वेळी आरशामुळे व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तीला मागे न वळता सहज बाहेर पडता येते व अपघात टळतो.