Namdev Gharal
कधीही पहिला पाऊस पडला की एक वेगळीच अनुभूती आपल्याला मिळते ती म्हणजे मृदगंधाची, म्हणजेच मातीच्या सुंगधाची
हा सुंगध आपल्याला खूप आनंद देता, एक प्लेझंट वातावरण तयार होते व मन ही आनंदून जाते. तय या सुगंधापाठीमागचे कारण जाणून घेऊया
या सुगंधाला 'पेट्रिकोर' (Petrichor) असे म्हणतात. हा पहिल्यांदा ज्यावेळी जमीन तापलेली असते व पाऊस पडतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात हा सुगंध पसरतो
या पाठीमागे एका रसायनाची कमाल असते ते म्हणजे जिओस्मीन geosmin नावाचे, हे जिओस्मिन मातीत कायमचे असते पण पाऊस पडल्यावर ते रिलीज होते
हे जिओस्मिन नावाचे रसायन जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मातीतील बॅक्टेरीया जेव्हा रिॲक्शन देतात तेव्हा सक्रिय होते.
पाऊस पडल्यानंतर हे बॅक्टेरीया स्पोअर Spore (बिजाणू) बनवतात व त्यातून हे जिओस्मिन रिलीज होते
दुसरी गोष्ट म्हणजे या सुगंधासाठी आपले नाक खूप संवेदनशिल असते. १ ट्रिलीयन मॉलिक्यूलमध्ये जरी ५ मॉलिक्यूल जरी जिओस्मिनचे असले तरी नाक ते पकडते व आपल्याला सुगंधाची जाणीव होते
हे जिओस्मिन नाकाने पकडले की ते मेदूपर्यंत सिग्नल देते त्यानंतर ब्रेन लगेचच डोपामाईन रिलिज करते. हेच डोपामाईन आपल्याला आनंद देणारे केमिकल असते
त्यामुळेच ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी या जिओस्मिनमुळे आपल्या शरिरात डोपामाईन रिलीज होते व आपल्याना फ्रेश आनंदी वाटू लागते
हे जिओस्मिन मात्र अशा मातीमध्ये जास्त प्रमाणात असते जिथे प्रदूषण कमी असते, उदा. ग्रामीण भागात, शेत शिवारात हा पेट्रीकोअर शहराच्या मानाने खूप चांगला व अधिक असतो
शहरामध्ये याच्या उलट होऊ शकते . प्रदूषण व नाल्यांचे पाणी यामुळे पावसानंतर हेच मातीतील बॅक्टेरीया वेगळीत केमिकल रिॲक्शन करुन तीव्र वास पसरवतात.