पुढारी वृत्तसेवा
धोक्याची जाणीव होताच शरीर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागते.
मेंदूतील ‘Amygdala’ हा भाग सक्रिय होतो.
भीती जाणवताच मेंदूतील अमिग्डाला भाग सतर्क होऊन शरीराला सावध करतो.
शरीर ‘फाइट मोड’मध्ये जाते
शरीर स्वतःचा बचाव करण्यासाठी तयार होते आणि ऊर्जा वाढते.
अॅड्रेनालाईन हार्मोन वाढतो
भीतीमुळे शरीरात अॅड्रेनालाईनची पातळी झपाट्याने वाढते.
हृदयाचे ठोके आणि श्वास वेगाने वाढतात
भीतीच्या क्षणी शरीर अधिक सक्रिय होऊन श्वासोच्छवास जलद होतो.
स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो
अचानक वाढलेल्या स्नायूंच्या ताणामुळे हात-पाय थरथरू लागतात.
जास्त भीतीची इतर लक्षणे
घाम येणे, चक्कर येणे, अस्वस्थता वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात.
कधी कधी व्यक्ती बेशुद्धही पडू शकते
अत्यंत भीतीमुळे मानसिक आणि शारीरिक प्रतिक्रिया तीव्र होतात.
भीती कमी करण्यासाठी काय करावे?
दीर्घ श्वास घ्या, मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचार करून परिस्थिती हाताळा.