पुढारी वृत्तसेवा
समोरच्याला पाहून आपल्यालाही जांभई का येते?
एखाद्याला जांभई देताना पाहिलं की आपल्यालाही जांभई येते. याला ‘संसर्गजन्य जांभई’ म्हणतात.
ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित नाही
शास्त्रज्ञांच्या मते, संसर्गजन्य जांभई ही पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रक्रिया नाही. ती साधारण ४-५ वर्षांच्या आसपास सुरू होते.
सहानुभूतीशी आहे संबंध
इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता विकसित होत असताना संसर्गजन्य जांभईची शक्यता वाढते.
जवळच्या व्यक्तीला पाहून जांभई जास्त येते
पालक, मित्र-मैत्रिणी, जवळच्या व्यक्तीला जांभई देताना पाहिल्यास आपल्यालाही जांभई येण्याची शक्यता वाढते.
मेंदू करतो समोरच्याच्या कृतीचं ‘प्रतिबिंब’
आपल्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. एखादी व्यक्ती काही कृती करताना दिसली की हे न्यूरॉन्स सक्रिय होतात.
जांभईची कृती मेंदूला ‘जाणवते’
समोरची व्यक्ती जांभई देताना पाहिल्यावर मेंदू तिच्या कृतीचं प्रतिबिंब तयार करतो. त्यामुळे आपल्यालाही जांभई येण्याची इच्छा होऊ शकते.
सामाजिक संबंधांशीही जोडलेली आहे जांभई
संसर्गजन्य जांभईमुळे एकमेकांशी कनेक्ट होण्यास आणि समोरच्याला समजून घेण्यास मदत होऊ शकते.
फक्त माणसांनाच जांभई येत नाही
पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासे यांसारखे अनेक प्राणीही जांभई देतात. श्वान चिंपांझींमध्येही संसर्गजन्य जांभई आढळते.
वय वाढल्यावर ही क्षमता कमी होऊ शकते
मानव आणि चिंपांझी या दोघांमध्येही वय वाढल्यानंतर संसर्गजन्य जांभईची क्षमता कमी होऊ शकते.