कायान जमातीतील महिला गळ्यात पितळेच्या कड्या का घालतात?

पुढारी वृत्तसेवा

‘जिराफ वूमन’ म्हणून का ओळखल्या जातात?

म्यानमारमधील कायान जमातीतील महिला गळ्यात पितळेच्या कड्या घालतात. त्यामुळे त्यांची मान लांब दिसते.

वयाच्या ५-६ वर्षांपासून सुरुवात!

कायान जमातीतील मुलींना अगदी लहान वयातच गळ्यात पहिली पितळेची कडी घातली जाते. वय वाढत गेले की कड्यांची संख्या वाढवली जाते.

गळ्यात असतात २० ते २५ कड्या!

प्रौढ महिलेच्या गळ्यात साधारण २० ते २५ पितळेच्या कड्या असू शकतात. या कड्यांचे एकूण वजन तब्बल ५ ते १० किलोपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

खरंच मान लांब होते का?

या कड्यांमुळे मान प्रत्यक्षात लांब होत नाही. कड्यांच्या वजनामुळे खांद्याचा भाग खाली दाबला जातो आणि त्यामुळे मान अधिक लांब असल्याचा भास होतो.

वाघाच्या हल्ल्यापासून बचावासाठी परंपरा?

पूर्वी जंगलात राहणाऱ्या कायान लोकांवर वाघांसारखे हिंस्र प्राणी हल्ला करत असत. गळ्याचे संरक्षण करण्यासाठी कड्या घालण्याची सुरुवात झाली असावी, असे मानले जाते.

लांब मान म्हणजे सौंदर्याचे प्रतीक!

कायान संस्कृतीत लांब मान आणि गळ्यात जास्त कड्या असणे हे सौंदर्य आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जात असे. त्यामुळे या परंपरेला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

महिलांचे अपहरण रोखण्यासाठीही कड्या?

काही ऐतिहासिक सिद्धांतांनुसार, इतर जमातीतील लोकांनी महिलांचे अपहरण करू नये म्हणून त्यांना वेगळे दिसण्यासाठी ही प्रथा सुरू झाली असावी.

म्यानमारमधून थायलंडमध्ये स्थलांतर

कायान जमातीचे लोक प्रामुख्याने म्यानमारमधील कायाह राज्यात राहतात. राजकीय अस्थिरतेमुळे या समुदायातील लोक थायलंडच्या सीमावर्ती भागात, चेयांग माई परिसरात स्थलांतरित झालेत.

आता नवीन पिढी परंपरेपासून दूर!

आधुनिक काळात कायान जमातीतील काही तरुण मुली गळ्यात जड पितळेच्या कड्या घालण्याची परंपरा स्वीकारत नाहीत. शतकानुशतके जुनी परंपरा बदलताना दिसत आहे.