Yawning | कंटाळा आला किंवा थकवा आला की आपल्याला जांभई का येते?

Namdev Gharal

आपण कधी निरीक्षण केले आहे का अपल्याला जेंव्हा थकवा येतो, किंवा झोप पुरेशी झालेली नसते, किंवा कंटाळा येतो तेव्हां जांभई येते

जाभंई येण्यामागे काय कारणे असतात? शरीर कोणता संकेत देत असते हे जाणून घेउया

शरीराला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा: जेव्हा आपण थकतो, तेव्हा आपल्या श्वासाची गती मंदावते. जांभईमुळे शरीरात एकाच वेळी जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो.

जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही किंवा शरीर खूप थकलेले असते, तेव्हा मेंदूला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा काहीसा मंद होतो. अशा वेळी शरीर एक मोठी जांभई घेऊन फुफ्फुसात जास्त हवा भरून घेते

शास्त्रज्ञांच्या मते, जांभई ही मेंदूसाठी 'एअर कंडिशनिंग' सारखे काम करते. थकव्यामुळे मेंदूचे तापमान वाढते, जांभई घेतल्याने थंड हवा आत जाते आणि मेंदूला थंडावा मिळतो.

जांभई देताना आपल्या चेहऱ्याचे आणि मानेचे स्नायू ताणले जातात. यामुळे मेंदू आणि मानेच्या भागातील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.

जेव्हा आपण एखादे काम दीर्घकाळ करत असतो किंवा आपल्याला त्यात रस नसतो, तेव्हा आपली एकाग्रता कमी होऊ लागते. अशा स्थितीत मेंदू स्वतःला सक्रिय (Alert) ठेवण्यासाठी जांभईचा वापर करतो.

जांभईमुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या पूर्णपणे प्रसरण पावतात, ज्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षमतेने काम करू लागतात.

जांभई ही 'संसर्गजन्य' असते. दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येते, हे मेंदूतील 'मिरर न्यूरॉन्स'मुळे घडते, जे इतरांच्या कृतीची नक्कल करतात. याला Contagious Yawning म्हणतात