Sweating After Eating | उन्हाळ्यात जेवणानंतर शरीराला जास्त घाम का येतो?

Namdev Gharal

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे शरिराला घाम येणे नॉर्मल असते पण आपल्या लक्षात येईल की जेवल्यानंतर आपल्या शरीराला खूप जास्त घाम येऊ लागतो

पण ही एक सामान्य प्रक्रीय आहे या पाठीमागे, शरीराचे काही महत्‍वाचे गूणधर्म तसेच शास्त्रिय कारणेसुद्धा आहेत

यामध्ये घाबरुन जाण्यासासारखे काहीही नसते, ही प्रक्रिया आहे नैसर्गिक! जाणून घ्या याची शास्त्रीय कारणे असतात

जेवण पचवण्यासाठी शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. ही पचनक्रिया सुरू असताना शरीराचे अंतर्गत तापमान किंचित वाढते.

शरीर हे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी 'थंडावा' निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर सोडले जाते.

तुम्ही तिखट, मसालेदार किंवा गरम पदार्थ खाल्ले तर यातील 'कॅप्सिसिन' घटक आपल्या घाम ग्रंथींना उत्तेजित करतो, ज्यामुळे घामाचा वर्षाव होतो.

काही लोकांना जेवताना चेहरा किंवा कपाळावर लगेच घाम येतो. याला वैद्यकीय भाषेत 'गस्टटरी हायपरहायड्रोसिस' म्हणतात. ही नसांच्या अतिसंवेदनशीलतेची प्रतिक्रिया असते.

ज्यांचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो, त्यांचे शरीर पचन करताना अधिक उष्णता निर्माण करते. त्यामुळे त्यांना सामान्य लोकांपेक्षा जास्त घाम येणे स्वाभाविक आहे.

उन्हाळ्यात बाहेरची हवा दमट असते. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे घामाचे थेंब त्वचेवर जास्त वेळ टिकून राहतात, ज्यामुळे आपल्याला जास्त घाम आल्यासारखे वाटते.

जेवण खूप गरम असताना खाऊ नका. ते थोडे कोमट किंवा सामान्य तापमानाचे होऊ द्या. यामुळे शरीराचे तापमान अचानक वाढत नाही.