पुढारी वृत्तसेवा
आपल्यापैकी बहुतेकजण जांभईला केवळ झोप किंवा थकव्याचे लक्षण मानतात
ब्रिटनचे प्रसिद्ध सर्जन डॉ. करण राजन यांच्या मते, जांभईमागे एक पूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया कार्यरत आहे
जांभई घेताना कानाच्या आतील 'युस्टेशियन ट्यूब' उघडते. ही ट्यूब मध्यकर्णाला घशाशी जोडते, जांभई घेताना जेव्हा जबडा ताणला जातो
त्यामुळे कानाच्या आतील हवेचा दाब संतुलित होतो, तेव्हा कानाचा पडदा अधिक चांगल्या प्रकारे लहरी निर्माण करू शकतो. यामुळे आवाज अधिक स्पष्ट आणि तीक्ष्ण ऐकू येतो
जांभई घेताना कानातील 'टेन्सर टिम्पानी' आणि 'स्टेपिडियस' हे दोन लहान स्नायू सक्रिय होतात. ज्यामुळे ऐकण्याची क्षमता थोड्या काळासाठी तीव्र होते
हवाई प्रवासात कान 'पॉप' होण्याचा जो अनुभव येतो, अगदी तसाच परिणाम जांभईमुळे होतो. या दोन्ही परिस्थितीत कानाचा दाब संतुलित केला जातो
जांभईच्या वेळी मेंदूतील रक्तप्रवाहदेखील वाढतो, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता थोड्या काळासाठी तीव्र होते
डॉ. राजन यांच्या मते, जांभई एक प्रकारचा 'अकृस्टिक डिफेन्स रिफ्लेक्स देखील असू शकतो
म्हणजेच, शरीराच्या आत निर्माण होणाऱ्या आवाजांपासून (उदा. स्वतःचा आवाज किंवा दात खाणे) कानाचे संरक्षण करण्यास हे मदत करते