पुढारी वृत्तसेवा
साप वारंवार जीभ बाहेर का काढतो? भीती की आणखी काही? जाणून घ्या यामागचे रंजक वैज्ञानिक कारण!
साप दिसताच अनेकांची घाबरगुंडी उडते. विशेषतः त्याची सतत आत-बाहेर होणारी जीभ पाहून लोक जास्त घाबरतात.
अनेकांना असे वाटते की, साप समोरच्याला घाबरवण्यासाठी किंवा राग व्यक्त करण्यासाठी जीभ बाहेर काढतो; पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.
निसर्गतः सापांची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता अत्यंत मर्यादित असते. त्यामुळे त्यांना इतर अवयवांवर अवलंबून राहावे लागते.
आसपासचे वातावरण समजून घेण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि शिकार शोधण्यासाठी साप आपल्या जिभेचा वापर करतो.
सापाची जीभ ही त्याच्यासाठी एका 'खास सेन्सर'प्रमाणे (Sensor) काम करते, जी त्याला आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देते.
साप जेव्हा जीभ बाहेर काढतो, तेव्हा हवेत तरंगणारे अतिसूक्ष्म कण त्याच्या जिभेला चिकटतात.
जीभ आत घेताच हे कण तोंडाच्या वरच्या भागातील 'जेकब्सन ऑर्गन' (व्होमेरोनाझल ऑर्गन) पर्यंत पोहोचतात, जो या कणांचे अचूक विश्लेषण करतो.
हा अवयव कणांचे विश्लेषण करून मेंदूकडे संदेश पाठवतो. यामुळे आसपास शिकार, शत्रू किंवा एखादा अडथळा आहे का, हे सापाला समजते.
सापाची जीभ पुढे दोन भागांत विभागलेली असते. या रचनेमुळेच वास किंवा येणारा धोका नेमका कोणत्या दिशेने येतोय, हे सापाला अचूक कळते.