रिक्षाला तीनच चाकं का असतात? जाणून घ्या..

पुढारी वृत्तसेवा

ऑटोरिक्षामध्ये बसल्यावर रिक्षाला तीन चाकं का असतात? असा प्रश्न आपल्याला केंव्हातरी पडला असेल.

इतर वाहनांप्रमाणे रिक्षाला चार किंवा दोन चाकं का नसतात? हे आपण जाणून घेउयात.

ऑटोरिक्षाची कॉम्पॅक्ट रचना हे एक कारण असू शकतं. रिक्षाला अरूंद रस्त्‍यावरूनही आरामात चालवता येतं.

तीन चाकी रिक्षा बनवणे हे थोडे कमी खर्चीक आहे. असे वाहन चालवणेही सोपे आहे. इंजिन छोटे असल्याने वजनही कमी आहे.

शिवाय रिक्षाला मोठ्या वाहनांच्या तुलनेत कमी इंधन लागते. त्‍यामुळे वाहनधारकाच्या ते बजेटमध्ये बसते.

कॉम्पॅक्ट कारच्या तुलनेत ऑटो रिक्षा चालक आणि प्रवासी अशा दोघांच्याही फायद्याची आहे. कमाईही करणे सोपे. शिवाय प्रवाशांनाही परवडते.

मोठी कार असेल तर ती चालक आणि प्रवासी अशा दोघांच्याही आवाक्याबाहेर जाईल्. त्‍यामुळे रिक्षा बेस्ट ऑप्शन आहे.

वरील सर्व माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.