Peacock's plumage |आकाश ढगाळून आल्यावरच मोर पिसारा का फूलवतो?

Namdev Gharal

ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापुस पिंजला रे, नाच रे मोरा नाच असे वर्णन आपल्या कवीतेत असते. पण ढग आल्यावरच मोर पिसारा का फूलवतो. या पाठीमागे आहेत रंजक कारणे

पावसाळ्याच्या सुरुवातीला, जून महिन्यात किंवा आकाश ढगाळून आल्यावर मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचू लागतो. हे विहंगम दृश्य आपल्या सगळ्यांनाच मोहीत करतं

पावसाळ्याची सुरुवात म्हणजे मोरांचा विणीचा हंगाम असतो. या काळात नर मोरांना लांडोरीला आकर्षित करायचे असते. यासाठी तो पिसारा फूलवतो

आपला भलामोठा, रंगीबेरंगी आणि चमकदार पिसारा फुलवून मोर लांडोरीसमोर नाचतो आणि ‘मीच कसा सर्वात बलवान आणि सुंदर जोडीदार आहे,’ हे दाखवण्याचा प्रयत्न करतो

ढग दाटून आल्यावर आणि विजेच्या कडकडाटासह हवेत गारवा निर्माण झाल्यावर मोराला पावसाचे वेध लागतात. निसर्गात होणारा हा बदल मोरांना प्रचंड आनंद देतो. यामुळे मोर पिसारा फुलवून नाचू लागतो

अन्नाची उपलब्धता पाऊस पडल्यानंतर जंगलात, शेतात कीटक, अळ्या, बेडूक आणि इतर अन्न मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते

होणाऱ्या पिलांसाठी अन्नाची कमतरता भासणार नाही, याची निसर्गतःच त्यांना जाणीव होते. त्यामुळे या अनुकूल हवामानाचे स्वागत करण्यासाठी मोर पिसारा फुलवतो

थोडक्यात सांगायचे तर, पिसारा फुलवणे ही मोराची आनंद व्यक्त करण्याची आणि आपला जोडीदार शोधण्याची एक नैसर्गिक आणि सुंदर पद्धत आहे

आपण ज्याला मोराचा देखणा 'पिसारा' म्हणतो, तो प्रत्यक्षात त्याची शेपटी नसून, त्याच्या पाठीवरची लांब पिसे असतात! मुख्य शेपटी या पिसार्‍याच्या मागे लपलेली असते आणि ती पिसारा पेलून धरण्यास मदत करते