जगभरातील पुरुष नोव्हेंबरमध्ये ‘शेव्हिंग’ का टाळतात ? जाणून घ्या..

पुढारी वृत्तसेवा

नोव्हेंबर महिना सुरू झाला की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू होतो. तो म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर.

एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक सगळीकडे पुरुष मंडळी लांब केस, वाढलेल्या दाढी-मिशांमध्ये आपले फोटो शेअर करताना दिसतात.

अनेकांसाठी ही केवळ एक फॅशन किंवा आळशीपणासाठी मिळालेली सूट असते. पण ‘नो शेव्ह’ करण्यामागे एक खास कारण आहे.

कटिंग, वैक्सिंग, थ्रेडिंग यांसारखे शरीराचे केस काढण्याचे सर्व प्रयत्न या 30 दिवसांसाठी थांबवले जातात.

हा ट्रेंड फक्त एका शहरात किंवा देशात नाही, तर जगभर मोठ्या उत्साहाने पाळला जातो.

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ साजरा करण्यामागे असलेले मुख्य कारण म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती करणे.

केस आणि दाढीची काळजी घेण्यासाठी जो पैसा खर्च होतो, तो खर्च या मोहिमेला दान केला जातो.

कॅन्सर प्रतिबंध, उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना या पैशांची मदत होते.

या अभियानाची सुरुवात 2009 साली एका अमेरिकन स्वयंसेवी संस्थेद्वारे, ‘मॅथ्यू हिल फाऊंडेशन’ ने केली होती.

2007 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात राहणार्‍या मॅथ्यू हिल यांचे कॅन्सरशी लढताना निधन झाले.

death | pudhari File Photo

त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच कॅन्सरशी झुंज देणार्‍या इतरांना मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. यातूनच ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या मोहिमची सुरुवात झाली.