Jeans Small Pocket | जिन्स पँटला लहान पॉकेट का असतं? कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

पुढारी वृत्तसेवा

जिन्स पँटच्या पुढच्या खिशाच्या आत असणारे लहान पॉकेट (Small Pocket किंवा Watch Pocket) हे केवळ डिझाइनसाठी नसून त्यामागे एक रंजक इतिहास आहे

जिन्स पँटच्या पुढच्या खिशातील लहान पॉकेट प्रथम Levi Strauss & Co. ने 1873 मध्ये तयार केलेल्या ब्लू जिन्समध्ये दिसून आले

त्या काळात मनगटी घड्याळे (Wrist Watches) प्रचलित नव्हती. लोक साखळीला जोडलेली छोटी खिशातील घड्याळे (Pocket Watches) वापरत असत

हे घड्याळ सुरक्षित ठेवण्यासाठीच हे लहान पॉकेट बनवले गेले. त्यामुळे याला Watch Pocket असे नाव देण्यात आले

बहुतेक लोक या पॉकेटला "Coin Pocket" समजतात, पण त्याचा मूळ उद्देश नाणी ठेवणे नव्हता. ते खास Pocket Watch सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते

जुन्या काळातील कामगार, खाणकाम करणारे आणि शेतकरी कठीण परिस्थितीत काम करत, त्यामुळे लहान पॉकेटमध्ये ठेवलेले घड्याळ अधिक सुरक्षित राहत असे

काळानुसार Pocket Watch वापरणे कमी झाले. पण हे पॉकेट जिन्सच्या पारंपरिक डिझाइनचा भाग बनले. आणि हे लहान पॉकेट कायम राहिले

Watch Pocket, Coin Pocket, Ticket Pocket, Fob Pocket अशा वेगवेगळ्या नावांनी लहान पॉकेटला ओळखले जाते

परंपरा, क्लासिक जिन्स, ब्रँडची ओळख कायम ठेवण्यासाठी आजही लहान पॉकेट जवळजवळ सर्व पारंपरिक जिन्समध्ये कायम ठेवले आहे

येथे क्लिक करा