पुढारी वृत्तसेवा
माती खाण्याची सवय धोकादायक
लहान मुलांची माती खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पिका (Pica) विकाराशी संबंध
माती, खडू, भिंतीचा रंग यांसारख्या अखाद्य वस्तू खाणे हे पिका विकाराचे लक्षण असू शकते.
पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे सवय
कॅल्शियम, आयर्न आणि झिंकची कमतरता असल्यास मुलांना माती खाण्याची इच्छा होऊ शकते.
कुपोषणही ठरू शकते कारण
योग्य व संतुलित आहार न मिळाल्यास मुलांमध्ये ही सवय वाढू शकते.
अशक्तपणा जाणवू लागतो
माती खाणाऱ्या मुलांमध्ये कमजोरी, थकवा आणि ऊर्जा कमी होण्याची समस्या दिसू शकते.
चिडचिड आणि भूक मंदावते
माती खाल्ल्याने मुलांची भूक कमी होते आणि ते अधिक चिडचिडे होऊ शकतात
पोटाच्या तक्रारी वाढतात
बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
पोषक आहार द्या
आयर्न, प्रथिने, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वांनी युक्त आहार दिल्यास ही सवय कमी होऊ शकते.
हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा
पालेभाज्या व व्हिटॅमिन C युक्त हंगामी फळे मुलांच्या आहारात नियमित द्या.
मुलांसोबत वेळ घालवा
पालकांनी मुलांकडे लक्ष देणे, संवाद साधणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणेही ही सवय कमी करण्यास मदत करते.