पुढारी वृत्तसेवा
60 आणि 70 च्या दशकात धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील सर्वात देखणे आणि मजबूत शरीरयष्टी असलेले नायक मानले जायचे.
त्याच्या फिटनेस, दमदार ॲक्शन आणि पुरुषी व्यक्तिमत्वामुळे चाहत्यांनी आणि मीडियाने त्याला “ही-मॅन ऑफ बॉलीवूड” अशी उपाधी दिली.
1966 च्या ‘फूल और पत्थर’ चित्रपटातील त्याच्या परफॉर्मन्सनंतर धर्मेंद्रचा 'ॲक्शन हिरो' म्हणून दर्जा पक्का झाला.
एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले होते, “मी शरीर दाखवण्यासाठी नाही, ताकदीच्या भावनांसाठी अभिनय करतो”. हीच त्याच्या ‘ही-मॅन’ प्रतिमेची खरी ओळख ठरली.
त्या काळात जिथे हिरो भावनिक किंवा रोमँटिक असायचा, तिथे धर्मेंद्रने शुद्ध शौर्य आणि शक्ती दाखवणारा हिरो साकारला.
धर्मेंद्रचे चाहते त्याला केवळ अभिनेता म्हणून नाही तर ताकदीचा हिरो मानू लागले.
‘शोले’तील वीरूने दाखवले की ‘ही-मॅन’ फक्त बलवान नाही, तो भावनीक आहे.
अभिनयानंतर राजकारणात उतरलेल्या धर्मेंद्रने तिथेही त्याच प्रामाणिकतेने आणि निर्भयपणे काम केले.
90 वर्षांहून अधिक वयातही धर्मेंद्र फिटनेस आणि आत्मविश्वासाने तरुणांना प्रेरणा देतो – खरा ही-मॅन यालाच म्हणतात