हिवाळ्यात खोबरेल तेल का गोठते? या सोप्या टिप्सनी पटकन वापरात आणा!

Namdev Gharal

हिवाळ्यात घाईच्या वेळी प्रत्‍येकाला एक प्रॉब्लेम सतावतो. तो म्हणजे खोबरेल तेल गोठणे, बाहेर जायच्या वेळी बाटली गोठलेली असते व पटकन केसांना लावता येत नाही.

का गोठते खोबरेल तेल? या तेलामध्ये 90 टक्के इतक्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असतात. या फॅटच्या अणूंची रचना एका सरळ रेषेत असते

थंड वातावरणामुळे यातील ही सरळ रेषेत असलेले अणू जास्त जवळ येतात व एक बंध (Strong Bond) तयार करता त्‍यामुळे तेलाचे रुपांतर द्रवरुपातून घनरुपात होते (Solid)

तसेच खोबरेलतेलाचा गोठणबिंदू हा इतर तेलांपेक्षा अधिक असतो. साधारणपणे 24 अंश ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत.

हिवाळ्यात घरातील सर्वसाधारण तापमान 20 ते 25 अंशापर्यंत जाते. त्‍यामुळे खोबरेल तेलाची बाटली पटकन गोठते.

सोप्या सोप्या उपयांनी हे तेल पटकन वापरात आणता येते यामध्ये मोठ्याऐवजी छोटी बाटली वापरा. लहान बाटलीतील तेल हाताच्या उष्णतेने पटकन वितळते

दुसरा सर्वात सोपा उपाय बाटलीला कोमट पाण्याच्या भांड्यात ठेवा. बाटली फक्त 1–2 मिनिटे पाण्यात ठेवा लगेच तेल वापरण्याजोगे होईल.

तेलात थोडे उष्णता देणारे तेल मिसळा उदाहरर्णाथ तीळ तेल किंवा बदाम तेल बाटलीच्या प्रमाणात 10% मिसळल्यास खोबरेल तेल इतक्या पटकन गोठत नाही.

मोठ्या डब्यातून थोडे तेल एका छोट्या बाटलीत काढून ठेवा. ही छोटी बाटली पटकन वितळते.

खोबरेल बाथरूममध्ये ठेवू नका तिथे पाण्याच्या जास्त वापरामुळे थंडी जास्त असते म्हणून ते आणखी लवकर गोठते.

तेलाची बाटली स्वयंपाकघरातील कपाटात (जेथे तापमान तुलनेने जास्त असते) किंवा घराच्या उष्ण भागात ठेवा.

खोबरेल तेल रुंद तोंडाच्या बरणीत (जारमध्ये) ठेवा. तेल घट्ट झाल्यावर ते चमच्याने काढणे सोपे होते.

घट्ट झालेले तेल चमच्याने काढा हाताच्या तळव्यावर घ्या.शरीराच्या उष्णतेमुळे (Body Heat) तेल त्वरित वितळून जाईल.