अविनाश सुतार
मांजरी त्यांच्या तीक्ष्ण इंद्रियांसाठी आणि स्वतंत्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही सर्वात जास्त असुरक्षित असता. त्यावेळी मांजर एक प्रकारे तुमची 'रक्षक' बनून लक्ष ठेवते
तुम्ही सुरक्षित आहात ना, तुमचा श्वास व्यवस्थित सुरू आहे ना किंवा तुम्ही जिवंत आणि सुखरूप आहात ना, हे तपासण्यासाठी ती तुमच्या तोंडाकडे किंवा शरीराकडे टक लावून पाहते
मांजरी नैसर्गिकरित्या क्रेपस्क्युलर प्राणी आहे, त्या पहाटे आणि रात्री अधिक सतर्क असतात. त्यामुळे त्या निरीक्षण करत आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत असते
भूक लागली असेल किंवा खाण्याची वेळ झाली असेल, तर मांजर तुमच्या झोपेतून उठण्याची वाट पाहत असते. तर ती तुम्हाला न उठवता शांतपणे तुमच्याकडे बघत बसते
अनेक मांजरी आपल्या मालकांना झोपेत पाहतात, कारण त्यांच्यासाठी मालक म्हणजे शिकारीपेक्षा सुरक्षितता, ओळख आणि आपुलकीचे ठिकाण असते
जर मांजर तुमच्याकडे बघताना मध्येच हळूवार डोळे मिचकावत असेल, तर समजा की ती तुमच्यावर खूप प्रेम करते. डोळे मिचकावणे म्हणजे 'आय लव्ह यू' म्हणण्यासारखे आहे
मांजरी गरज नसल्यास फारसे आवाज करत नसल्यामुळे, मालकाकडे टक लावून पाहणे हा संवादाचा सूक्ष्म प्रकार असू शकतो
वयस्कर मांजरींमध्ये रात्री सतत टक लावून पाहणे, इकडे-तिकडे फिरणे किंवा गोंधळलेले वागणे हे वयाशी संबंधित मेंदूतील बदलांशी जोडलेले असू शकते
झोपेत घोरणे, हात-पाय हलवणे किंवा पुटपुटणे, या हालचाली मांजरींसाठी कुतूहलाच्या असतात. तुम्ही असे का करत आहात, हे समजून घेण्यासाठी मांजरी एकटक पाहते असते