Namdev Gharal
वेलचीला (Cardamom) तिच्या सुगंधामुळे आणि खास चवीमुळे 'मसाल्यांची राणी' (Queen of Spices) म्हटले जाते.
वेलचीचा वापर जगभरात केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर औषधे आणि सुगंधित पदार्थांमध्येही केला जातो.
वेलची मोहक सुगंध आणि कोणत्याही पदार्थाला एक शाही स्वरूप देण्याच्या क्षमतेमुळे मसाल्यांची राणी हे बिरूद मिळवून देते.
वेलची ही मसाल्याची राणी असेल, तर मिरीला (Black Pepper) 'मसाल्यांचा राजा' (King of Spices) मानले जाते
हिरवी वेलची हिला मुख्यत्वे 'राणी' मानले जाते. ही चहा, मिठाई आणि मुखवासासाठी वापरली जाते. काळी वेलची गरम मसाल्यांमध्ये वापरली जाते.
वेलची पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गुणकारी आहे. जेवणानंतर वेलची खाल्ल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते.
वेलची एक उत्तम नॅचरल माउथ फ्रेशनर आहे. ती चावून खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
सर्दी, खोकला किंवा दमा असलेल्या लोकांसाठी वेलची फायदेशीर ठरते. ती फुफ्फुसांमधील रक्ताभिसरण वाढवते.
वेलचीचा सुगंध मनाला शांत करतो. वेलचीचा चहा किंवा फक्त तिचा सुवास घेतल्याने स्ट्रेस (Stress) कमी होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत होते.