Auto Rickshaw: ऑटो-रिक्षाला ३ चाकेच का असतात? जाणून घ्या यामागचे 'सायन्स'!

पुढारी वृत्तसेवा

भारतीय रस्त्यांची शान म्हणजे 'ऑटो-रिक्षा'! पण कधी विचार केलाय की हिला ४ ऐवजी ३ चाकेच का असतात?

कमी जागेत वळवता येतो

ऑटो-रिक्षाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी जागेत वळण्याची क्षमता. तीन चाकी डिझाइनमुळे अतिशय लहान 'टर्निंग रेडियस' मिळतो. चार चाकी गाडीला वळण्यासाठी जास्त जागा लागते, मात्र ऑटो-रिक्षा एकाच ठिकाणी सहजपणे फिरू किंवा वळू शकतो.

पुढचे एक चाक दिशा देते, तर मागची दोन चाके इंजिन आणि प्रवाशांचे वजन पेलतात. यामुळे गाडी हलकी राहते.

एक चाक कमी असल्यामुळे टायर, रिम आणि एक्सेलचा खर्च वाचतो. पर्यायाने रिक्षाची किंमत कमी होते.

४ चाकी गाड्यांच्या तुलनेत रिक्षाचे मेकॅनिझम साधे असते, त्यामुळे दुरुस्तीचा खर्च खूपच कमी असतो.

गाडीचे वजन कमी असल्याने इंजिनवर ताण पडत नाही. यामुळे रिक्षा कमी इंधनात जास्त अंतर धावते.

गुंतागुंतीचे सस्पेन्शन नसल्यामुळे ही गाडी बनवणे आणि चालवणे दोन्ही सोपे असते.

तीन पाय असलेल्या स्टूलप्रमाणे, ३ चाकी रिक्षा कच्च्या रस्त्यांवरही स्वतःचा समतोल चांगल्या प्रकारे राखते.

ग्रामीण भागापासून शहरापर्यंत स्वस्त वाहतुकीसाठी रिक्षा हाच सर्वात यशस्वी पर्याय ठरला आहे.

कमी खर्च, जास्त फायदा आणि जबरदस्त मायलेज! यामुळेच ३ चाके ४ पेक्षा भारी ठरतात.