पुढारी वृत्तसेवा
आपण बरेचजण जेवणासाठी किंवा नाष्ट्यासाठी हॉटेलमध्ये जातो. यावेळी जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर दिली जाते.
जेवणानंतर सर्वांनाच बडीशेप आणि खडीसाखर खायला आवडते.
हॉटेलच्या पेमेंट काउंटरवर एका बाउलमध्ये बडीशेप आणि खडीसाखर ठेवलेली आढळते.
मोठ्यांसोबतच लहान मुलेही बडीशेप आणि खडीसाखर आवडीने खातात.
हॉटेलमध्ये मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवू शकतो.
अशावेळी बडीशेप खाल्ल्याने त्यातील नैसर्गिक् तेल ॲनेथॉल पाचक रस आणि एन्जाईमच्या स्त्रावाला मदत करतं. त्यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते.
तर सोबतच्या खडीसाखरेच्या सेवनामुळे पोट थंड राहते आणि आम्लपित्ताचा त्रास जाणवत नाही.
मसालेदार अन्न खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येउ शकते. अशावेळी बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. तर खडीसाखर तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करते.