मोहन कारंडे
मेट गाला म्हणजे जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन कार्यक्रम. तरीही ऐश्वर्या राय कधीच तिथे दिसली नाही!
मेट गालाला कोणाला बोलवायचं हे व्होगची टीम आणि डिझायनर ब्रँड्स ठरवतात. सगळ्यांना प्रवेश नसतो.
ऐश्वर्या दरवर्षी ल’ऑरियल अॅम्बेसेडर म्हणून कान्स फेस्टिव्हलमध्ये भाग घेते. कान्स आणि मेट गाला दोन्ही मे महिन्यातच असते.
एप्रिल-मे महिन्यात एश्वर्याचं शेड्यूल आधीच तंग असतं, त्यामुळे फॅशन शोसाठी वेळ नसतो.
ती पश्चिमेकडील ट्रेंडपेक्षा भारतीय पोशाख, डिझायनर्सना जागतिक मंचावर सादर करणं महत्त्वाचं मानते.
या समारंभासाठी आठवड्याभराचं नियोजन, डिझायनर फिटिंग्स, ट्रॅव्हल यांचा ताळमेळ आवश्यक.
ऐश्वर्या फॅशनपेक्षा स्वत:ला जपणं पसंत करते. केवळ फोटोंसाठी स्वतःला बदलत नाही.
ती अनेकदा महिला सशक्तीकरण, बालकल्याण आणि पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पसंती देते.
भविष्यात ऐश्वर्या मेट गालात झळकू शकते. पण तेव्हा ती ‘भारतीय सौंदर्यदूत’ म्हणूनच चमकेल.