Childhood Obesity: ५ ते ९ वर्षातील तब्बल ७ कोटी मुले 'ओव्हरवेट'... WHO ने दिल्या गाईडलाईन

Anirudha Sankpal

लठ्ठपणाची गंभीर आकडेवारी

२०२४ च्या आकडेवारीनुसार जगभरात १७ कोटी बालके आणि किशोरवयीन मुले लठ्ठपणाने ग्रस्त असून, यात १० कोटी मुले १० ते १९ वयोगटातील आहेत.

दीर्घकालीन आरोग्याला धोका

बालपणीच लठ्ठपणा सुरू झाल्यामुळे पुढे चालून टाइप-२ डाएबेटीस आणि हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

मानसिक आरोग्यावर परिणाम

लठ्ठपणाशी झगडणाऱ्या मुलांना भेदभाव आणि 'बुलीइंग'चा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो.

वजन कमी करणाऱ्या उपचारांवर मर्यादा

डब्ल्यूएचओ ० ते ९ वयोगटातील मुलांसाठी कोणतीही औषधे, सर्जरी किंवा उपकरणांच्या वापराची शिफारस करत नाही.

किशोरवयीन मुलांसाठी कडक अटी

१० ते १९ वयोगटातील मुलांसाठी गंभीर स्थितीत आणि लाइफस्टाइल सुधारूनही फरक पडला नाही तरच, काही ठरविक अटींवर औषधे किंवा सर्जरीचा विचार केला जाऊ शकतो.

जीवनशैलीत सुधारणा

उपचारांचा मूळ आधार संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या चांगल्या सवयी निर्माण करणे हाच असला पाहिजे.

पालकांची भूमिका

बालवयातच मुलांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी माता-पिता आणि पालकांनी अधिक सतर्क राहून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

जीवनभर चालणारी प्रक्रिया

ही नवी मार्गदर्शक तत्त्वे मुलांच्या आरोग्यासाठी 'लाइफ-कोर्स अप्रोच' (जीवनभर चालणारी प्रक्रिया) चा भाग म्हणून तयार करण्यात आली आहेत.

येथे क्लिक करा