Santosh Pandit Pune: संतोष पंडित कोण आहेत?

Rafique Pathan

पुण्यातील रस्ते, खड्डे, वाहतूक आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत संतोष पंडित सोशल मीडियावर चर्चेत आले.

Santosh Pandit Pune | Santosh Pandit Pune

स्थानिक समस्यांवर थेट भाष्य करणे आणि संबंधित प्रशासन व सार्वजनिक प्रतिनिधींना प्रश्न विचारायचे आणि उत्तर मागायचे, ही त्यांच्या सोशल मीडिया कंटेंटची ठळक शैली ठरली.

Santosh Pandit Pune | Santosh Pandit Pune

सामाजिक आणि नागरी प्रश्नांवरील त्यांच्या व्हिडीओंमुळे त्यांना सोशल मीडियावर मोठी ओळख मिळाली. थेट आणि आक्रमक शैलीमुळे ते समर्थकांसोबतच टीकाकारांचेही लक्ष वेधून घेतात.

Santosh Pandit Pune | Santosh Pandit Pune

नागरी प्रश्न मांडताना वापरलेल्या भाषेवरून आणि काही व्हिडीओंवरून संतोष पंडित यांच्यावर टीका होत राहिली आहे. अलीकडील प्रकरणात त्यांच्या सोशल मीडिया व्हिडीओंवरून तक्रारी दाखल झाल्या.

Santosh Pandit Pune | Santosh Pandit Pune

३ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक केली. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित व्हिडीओंमधील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे.

Santosh Pandit Pune | Santosh Pandit Pune

अटकेदरम्यानचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मोबाइल, बेल्ट आणि गाडीची किल्ली कुटुंबीयांकडे दिल्याचे वृत्त आहे.

Santosh Pandit Pune | Santosh Pandit Pune

संतोष पंडित प्रकरणामुळे सोशल मीडिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक व्यक्तींवरील टीका आणि कायदेशीर मर्यादा याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Santosh-Pandit-Pune | Santosh-Pandit-Pune

सामान्य नागरिकांच्या समस्या मांडताना सोशल मीडियावरील भाषेची आणि अभिव्यक्तीची मर्यादा नेमकी कुठे असावी?

तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Santosh-Pandit-Pune | Santosh-Pandit-Pune