तेलुगू सुपरनॅच्युरल सिनेमा मिराई नुकताच रिलीज झाला आहे.व्हिजूअल इफेक्टस आणि कथा हा दोन्हीबाबत हा सिनेमा लक्षवेधी ठरला आहे.या सिनेमात एक लोभस चेहरा समोर येतो आहे. रितिका नायक असे या अभिनेत्रीचे नाव आहे.साऊथ सिनेमातील एक चमकते नाव म्हणून रितिकाचा उल्लेख केला जातो आहे.रितिकाने 2019 मध्ये मॉडेलिंग करियरची सुरुवात केली.यानंतर तिने सिनेमांमध्ये काम करण्यासाठी ऑडिशन दयायला सुरू केले.‘अशोका वनमलो अर्जुन कल्याणम’ पासून अभिनयाच्या करियरची सुरुवात केली.पदार्पणातच तिच्या कामाचे कौतुक झाले.आता मिराईमधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे