Virat Kohli: विराट कोहलीची एक्स गर्लफ्रेंड कोण होती? 'ती' सध्या काय करते?
पुढारी वृत्तसेवा
विराट कोहली सध्या एका जर्मन इन्फ्लुएन्सरच्या पोस्टला लाईक केल्यामुळे चर्चेत असतानाच त्याची माजी प्रेयसीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एका इंस्टाग्राम पेजने विराट कोहलीच्या पसंतीबाबत एक कोलाज फोटो पोस्ट केला होता. यामध्ये विराटची पत्नी अनुष्का शर्मा, माजी प्रेयसी इझाबेल लीट, अवनीत कौर आणि एका जर्मन इन्फ्लुएन्सरचा फोटो होता.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते की, "महिलांच्या बाबतीत विराटची निवड नक्कीच 'एलीट' आहे. इझाबेलपासून अनुष्कापर्यंत... ही निवड त्याच्या ब्रँडचाच एक भाग आहे."
स्वतःचे नाव पुन्हा एकदा विराटशी जोडले गेल्याचे पाहून इसाबेल लेइटने या पोस्टवर कमेंट करत आपली नाराजी व्यक्त केली.
तिने थकल्याचा इमोजी वापरत लिहिले की, "या गोष्टीला आता १२ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हे सुरूच आहे. लोक या गोष्टी विसरून आयुष्यात पुढे का जात नाहीत?"
अनुष्का शर्मा आयुष्यात येण्यापूर्वी, २०१२ ते २०१४ या काळात विराट आणि इझाबेल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.
इझाबेल ही एक ब्राझीलियन मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने काही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सध्या ती विवाहित असून आपल्या पती आणि दोन मुलांसह कतारमधील दोहा येथे स्थायिक आहे.