सोनम वांगचुक यांच्या दुसऱ्या पत्नी गीतांजली कोण आहेत?

पुढारी वृत्तसेवा

सोनम वांगचुक यांच्या पत्नी कोण?

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली जे. आंग्मो यांच्याबद्दल जाणून घ्या.

सामाजिक उद्योजिका म्हणून ओळख

डॉ. गीतांजली आंग्मो या सामाजिक उद्योजिका असून शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

HIALच्या सह-संस्थापक

त्या 'हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टर्नेटिव्हज, लडाख (HIAL)'च्या सह-संस्थापक आहेत. ग्रामीण भागासाठी नाविन्यपूर्ण शिक्षणावर त्यांचा भर आहे.

शैक्षणिक प्रवास

त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली असून झेवियर इन्स्टिट्यूटमधून एमबीए पूर्ण केला आहे.

कॉर्पोरेटमधून शिक्षण क्षेत्रात

कॉर्पोरेट क्षेत्रात तब्बल 15 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्याची वाट निवडली.

प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव

त्या Chevening Fellow आहेत. तसेच भारत सरकारचा 'Women Transforming India Award'ही त्यांना मिळाला आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

गीतांजली या कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. त्या ओडिसी आणि रशियन बॅलेच्या प्रशिक्षित नृत्यांगनाही आहेत.

सोनम वांगचुक यांचा दुसरा विवाह

गीतांजली आंग्मो यांच्याशी झालेला विवाह हा सोनम वांगचुक यांचा दुसरा विवाह आहे.

पहिल्या पत्नी कोण होत्या?

सोनम वांगचुक यांच्या पहिल्या पत्नी अमेरिकन नागरिक रेबेका नॉर्मन होत्या.

प्रेरणादायी काम

शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि लडाखच्या विकासासाठी सोनम वांगचुक आणि डॉ. गीतांजली आंग्मो यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Adulterated Milk Side Effects | भेसळयुक्त दूध, तूप, पनीर खाताय? जाणून घ्या दुष्परिणाम

येथे क्लिक करा