Namdev Gharal
पिऱ्हाना मासा : ॲमेझॉन नदीत दहशत असलेल्या पिरान्हा माशाच्या तोंडात साधारण २५ ते ३० तिक्ष्ण दात असतात.
मानव : मानव प्राण्यामध्ये सर्वसाधारण ३२ दात असतात यामध्ये वरील जबड्यात १६ तर खालील जबड्यात १६ दात असू शकतात.
कुत्रा : कुत्र्यांना साधारण ४२ दात असतात, पण काही लहान प्रजातींमध्ये दात कमी असू शकतात
बर्मी अजगर (Burmese Python) : या प्रजातीच्या तोंडात साधारण १०० ते १५० लहान आतील बाजूस वळलेले दात असतात.जे भक्ष्याला जखडून ठेवतात.
सुसर : ही मगर कुळातील प्राणी असून याच्या लांबूटक्या तोंडात ११० टोकदार दात असतात
जळू (Leech) : प्रत्येक रक्त पिणाऱ्या जळूला तीन जबडे असतात यामध्ये प्रत्येकी १०० असे एकूण ३०० छोटे- छोटे दात जळूच्या तोंडात असतात
नाईल मगर : ही मगर आयुष्यभर दात बदलत राहते. जुने दात गळून पडले की त्यांच्या जागी नवे दात उगवतात. प्रत्येक दात ५०–६० वेळा बदलते आयुष्यभरात साधारण ३,००० ते ४,००० दात येतात.
ग्रेट व्हाईट शार्क: याच्या तोंडात एका वेळी साधारण ३०० दात असतात. या शार्कचे आयुष्यभरात अंदाजे २०,००० ते ३०,००० दात बदलले जाऊ शकतात
आफ्रिकन जायंट गोगलगाय (Achatina fulica) : या गोगलगायला साधे दात नसतात पण त्यांच्या तोंडात एक जीभेसारखी पट्टी असते ( रॅड्युला) यावर साधारण १०,००० ते २५,००० दात असू शकतात.
अम्ब्रेला स्लग (Umbrella slug ) : ही समुद्री गोगलगाय आहे. याच्याही रॅड्युलावर एकाचवेळी १० ते १५ हजार दात असतात. जे आयुष्यभर बदलत असतात त्यामुळे याच्या जीवनकाळात अंदाजे ५–१० लाख दात तयार होऊ शकतात.