White Hair To Black Hair: पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचा सोपा घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा

पांढऱ्या केसांपासून सुटका हवीये? केमिकल डाय वापरण्याऐवजी करा हा 'नैसर्गिक' उपाय. केस होतील मुळापासून काळे!

साहित्य काय काय लागेल?

१०० ग्रॅम मेहंदी पावडर, १०० ग्रॅम आवळा चूर्ण, २५० ग्रॅम चहापत्तीचे पाणी, लोखंडी कढई

लोखंडाच्या कढईत मेहंदी, आवळा चूर्ण आणि चहापत्तीचे पाणी एकत्र करा. हे मिश्रण ३ दिवस लोखंडी कढईतच राहू द्या.

तीन दिवसांनंतर मिश्रणात गरजेनुसार थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावा.

हा प्रयोग दर १५ दिवसांनी एकदा करा.

सुरुवातीला केस थोडे तांबूस दिसतील, पण नियमित वापरामुळे ते नैसर्गिकरित्या गडद काळे होऊ लागतील.

या उपायामुळे केसांचे नुकसान होत नाही.

आवळ्यामुळे केसांना पोषण मिळते आणि दाट व चमकदार होतात.