पुढारी वृत्तसेवा
इंग्लंडने या वर्षी आतापर्यंत 32 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9278 धावा फटकावल्या आहेत. हा संघ यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघ दुस-या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9036 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानने 42 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्यांनी 8291 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वे संघाने 33 सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 7577 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजने 32 सामन्यात 7160 धावा केल्या आहेत.
द. आफ्रिकेने 28 सामन्यात 7076 धावा केल्या आहेत.
बांगला देशने 37 सामन्यात 6970 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाने 27 सामन्यांमध्ये 6660 धावा फटकावल्या आहेत.
न्यूझीलंडच्या संघाने 32 सामन्यांत 6518 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेने 27 सामन्यांत 6136 धावा केल्या आहेत.