Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती कडधान्ये खाऊ नयेत?

पुढारी वृत्तसेवा

मधुमेहामध्ये आहाराची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. साखरेची पातळी खूप झपाट्याने वाढत असल्याने आहारात बदल अत्यावश्यक आहे. अन्यथा याचा परिणाम शरीरावर दिसून येतो.

मधुमेह झाल्यास जवळपास सर्वच कडधान्यांचे सेवन केले जाऊ शकते. तथापि, त्यांचे सेवन फक्त संतुलित प्रमाणात करा.

भाजी आणि कोशिंबीर यासारख्या गोष्टींचा एक वाटी मसुराच्या डाळीबरोबर समावेश करा.

काही कडधान्ये आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य मानली जात नाहीत. उदाहरणार्थ, उडीद डाळ, राजमा आणि पांढरे चणे.

ही कडधान्ये पचायला खूप कठीण असल्यामुळे पोटात सूज येण्यासारखी समस्या उद्भवू शकते.

उडीद डाळीचे अतिसेवन केल्याने शरीरातील युरिक अॅसिड वाढू शकते. यातील उच्च कॅलरी रक्तातील साखरेची पातळीदेखील वाढवू शकतात.

उडदाची डाळ सोडली, तर इतर सर्व डाळी मर्यादित प्रमाणात खायला काहीच हरकत नाही.

काही डाळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये मूग, तूर डाळ आणि हरभरा डाळीचा समावेश आहे.

या सर्व डाळींमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, झिंक, जीवनसत्त्वे यासारखी पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात आढळतात. त्यामुळे आहारात त्यांचा नियमित समावेश करावा.