पुढारी वृत्तसेवा
रोजच्या आहारात आपण डाळींचे सेवन करतो, पोषणमुल्ये, खनिजांनी समृद्ध डाळी आरोग्यासाठी आवश्यक असतात या डाळींचे फायदे व तोटे काय असतात ते पाहू
मूग डाळ हिरवी किंवा पिवळी :
आरोग्य आणि पोषणाचा विचार केल्यास मूग डाळ ही सर्व डाळींमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि पोषक मानली जाते. उच्च प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, लोहपचायला सर्वात हलकी असते
पचनास अत्यंत हलकी, प्रथिनांनी (Protein) समृद्ध आणि सर्व प्रकृतीच्या (वात, पित्त, कफ) लोकांसाठी अनुकूल असल्यामुळे तिला डाळींची 'राणी' म्हटले जाते.
मूग डाळीमुळे सहसा कोणताच त्रास होत नाही. ही पचायला सर्वात हलकी डाळ आहे आणि शरीरातील वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवते.
तूर डाळ
प्रथिने, फॉलिक ॲसिड (विटामिन B9), पोटॅशियमने समृद्ध असते रोजच्या जेवणातील मुख्य घटक म्हणजे तूर डाळ
तूर डाळ पचायला मध्यम-जड असल्याने रात्रीच्या वेळी खाल्ल्यास किंवा व्यवस्थित न शिजवल्यास गॅस , पोट फुगणे आणि ॲसिडिटी होऊ शकते.रात्रीच्या जेवणात ही डाळ खाणे टाळावे.
मसूर डाळ (लाल / काळी):
उच्च लोह (Iron), प्रथिने, फॉलिक ॲसिड आणि विरघळणारे फायबर (Soluble Fiber) अशी पोषणमूल्ये यामध्ये असतात.
मूग डाळीनंतर ही पचायला बऱ्यापैकी हलकी असते. मात्र, मसूर डाळ प्रकृतीने किंचित उष्ण असल्याने ज्यांना मूळव्याध किंवा तीव्र पित्ताचा त्रास आहे, त्यांनी याचे अतिसेवन केल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.
उडीद डाळ :
पोषणमूल्ये: कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने (प्रति १०० ग्रॅम ~ २५ ग्रॅम) आणि मॅग्नेशियमने अत्यंत समृद्ध.हाडे आणि स्नायूंना प्रचंड ताकद देते; थकवा दूर करते,
पण सर्व डाळींमध्ये पचायला सर्वात जड असल्याने, आतड्यांमध्ये प्रचंड वात आणि गॅस निर्माण करते. संधिवात (Joint pain), बद्धकोष्ठता, अपचन आणि उच्च युरिक ॲसिडचा त्रास असणाऱ्यांनी ही डाळ टाळावी किंवा अत्यंत कमी खावी.
चना डाळ (हरभरा डाळ) :
यामध्ये जटिल कर्बोदके (Complex Carbs), उच्च फायबर, लो-ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर प्रथिने असतात
पण ही डाळ पचायला खूप वेळ घेते. यातील विशिष्ट ऑलिगोसॅकराइड्समुळे (Oligosaccharides) तीव्र पोटफुगी, पोटात दुखणे आणि पोटात गुडगुडणे असा त्रास होतो.अपचनाचा त्रास आहे त्यांनी टाळावी.