Speedy Animal |जगात सर्वाधिक वेग कोणत्‍या सजीवाचा आहे?

Namdev Gharal

नंबर १० : उसेन बोल्‍ट (Usain Bolt – धावपटू) हा मनुष्‍य प्रजातीतील सर्वात वेगवान मानव आहे याचा कमाल वेग ४४ किलोमिटर प्रतितास आहे

नंबर ९ : ग्रे हाऊंड कुत्रा हा यानंतर सर्वाधिक धावू शकतो याचा कमाल वेग ७२ किमी प्रतितास असतो

नंबर ८ : आठव्या क्रमांकावर प्युमा हा प्राणी येतो याचा वेग ताशी ८० किलोमीटर (५० मैल) पर्यंत असतो.

नंबर ७ : क्वार्टर हॉर्स (Quarter Horse) – ८८ किमी/तास इतका वेग हा घोडा पकडू शकतो

नंबर ६ : प्राँगहॉर्न हरिण (Pronghorn Antelope) हे हरीण खूपच चपळ असते याचा वेग ८८–९८ किमी/तास इतका जातो

नंबर ५ : हंमिंगबर्ड हा खपू छोटा पक्षी असून याचा कमाल वेग ९८ किलोमीटर प्रतितास इतका जाऊ शकतो.

नंबर ४ : चित्ता हा जमिनीवील प्राण्यांमध्ये सर्वाधिक वेगवान असतो. हा शिकार पकडतो त्‍यावेळी ११०–१२० किमी/तास इतक वेग गाठतो

नंबर ३ : मेक्सिकन फ्री-टेल्ड वटवाघुळ या प्रजातीच्या BAT चा वेग हा ताशी १६० किलोमीटर (१०० मैल) पेक्षा जास्त असू शकतो

नंबर २ : गोल्डन ईगल (Golden Eagle) हा गरुड पक्षी शिकार करताना २४०–२८० किमी/तास वेग गाठतो

नंबर १ : पेरेग्रीन फाल्कन (Peregrine Falcon) हा पक्षी जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे. शिकार करताना एखाद्या गोळीसारखा हा झेप घेतो. यावेळी याचा वेग ३२० किमी/तास इतका असतो.