पुढारी वृत्तसेवा
जगभरातील विविध संस्कृतींमध्ये लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो; पण जेव्हा प्रश्न येतो सर्वाधिक घटस्फोट कुठे होतात, तेव्हा डोळ्यांसमोर लगेच अमेरिका किंवा युरोपीय देशांची नावे येतात.
मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने या समजाला पूर्णपणे छेद दिला आहे.
एका व्हायरल व्हिडीओमध्ये, एका व्यक्तीने हातात मायक्रो फोन घेऊन लोकांना विचारले, ‘जगात सर्वाधिक घटस्फोट कोणत्या देशात होतात?’
यावर लोकांनी आत्मविश्वासाने अमेरिका, युनायटेड किंगडम, स्पेन, थायलंड आणि फिनलंड अशी नावे घेतली. पण जेव्हा उत्तर समोर आले, तेव्हा सर्वांचेच चेहरे चकित झाले.
या व्हिडीओनुसार, मलेशिया हा तो देश आहे जिथे घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मलेशियासारख्या आशियाई देशाचे नाव समोर आल्याने इंटरनेटवर उलटसुलट चर्चा सुरू होत आहे.
सामान्यतः, पाश्चात्य देशांत घटस्फोट जास्त होतात असे मानले जात असताना, मलेशियाचे नाव येणे हे अनेकांसाठी अनपेक्षित होते.
जरी आकडेवारीवरून वाद असू शकतात, तरीही या व्हिडीओने ग्लोबल जनरल नॉलेजच्या बाबतीत नवीन चर्चा छेडली आहे.