पुढारी वृत्तसेवा
‘जमिनीचा शेवट कुठे होतो?’ हा प्रश्न ऐकायला थोडा गमतीशीर वाटतो.
पण खरे सांगायचे तर याचे उत्तर खूपच रजंक आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे नॉर्वे.
नॉर्वेला जगभरात ‘जमिनीचा शेवट’ किंवा ‘World’s End’ म्हणूनही ओळखले जाते. नॉर्वे हा उत्तर युरोपमधील एक अत्यंत सुंदर देश आहे.
तेथील नैसर्गिक सौंदर्य, बर्फाच्छादित पर्वत, खोल फियोर्डस् (समुद्राच्या अरुंद खाड्या) आणि उत्तर ध्रुवाजवळील स्थान, यामुळे तो जगातील अनोख्या ठिकाणांपैकी एक मानला जातो.
नॉर्वेचे सर्वात उत्तरेकडचे गाव ‘नॉर्डकॅप’ हे पृथ्वीवरील शेवटच्या वस्तीदार भागांपैकी एक आहे. त्यामुळे अनेकदा यालाच ‘जमिनीचा शेवट’ असे म्हणतात. तेथून पुढे फक्त आर्क्टिक महासागर सुरू होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेथे सूर्य मावळत नाही, म्हणजे २४ तास प्रकाश असतो आणि हिवाळ्यात अगदी उलट, काही महिन्यांसाठी पूर्ण काळोख पसरतो. हेच या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.
नॉर्वे शिक्षण, विज्ञान आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनेही प्रगत देश आहे. तेथे उत्तरेकडील प्रकाश म्हणजेच ‘ऑरोरा बोरेलिस’ पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
या ठिकाणचे वातावरण शांत आणि अद्भुत आहे. तेथे खरेच असे वाटत जणू आपण पृथ्वीच्या शेवटी आलो आहोत.