Health Tips : बदाम आणि अक्रोड कधी खावेत?

पुढारी वृत्तसेवा

सुकामेवा आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते, याद्वारे शरीरास अनेक फायदे मिळतात.

पण योग्य वेळेतच सुकामेवा खाल्ल्यास अधिक फायदे मिळतील, असे तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बदाम सकाळच्या वेळेस खावेत.

यातील व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात.

यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत मिळते. तसेच, एकाग्रता क्षमताही वाढते.

काही लोक अक्रोड सकाळच्या वेळेस खाणे पसंत करतात; पण तज्ज्ञांच्या मते, अक्रोड सकाळऐवजी संध्याकाळच्या वेळेस खावेत.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि मेलाटोनिनचे प्रमाण अधिक असते.

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करते, तर मेलाटोनिनमुळे झोप चांगली येते.

त्यामुळे अक्रोड संध्याकाळच्या वेळेस खाल्ल्यास चांगली झोप मिळेल आणि मेंदूलाही आराम मिळेल.