Weight Loss Breakfast: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात काय खावे?

पुढारी वृत्तसेवा

नाश्ता शरीराला ऊर्जा देतोच, शिवाय मूड आणि चयापचय देखील सुधारतो. नाश्त्यात तुम्ही अनेक पदार्थ खाऊ शकता.

poha breakfast

जाणून घेऊया की वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी सकाळी नाश्त्यात काय खावे?

Breakfast myths | Pudhari Canva

कडधान्ये आणि मोड आलेली धान्ये यात फायबर आणि प्रोटीन भरपूर असते.

मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी ‘सुपरफूड’! | File Photo

प्रथिने खाल्ल्यामुळे भूक कमी लागते आणि स्नायूंची ताकद वाढते. यासाठी उकडलेली अंडी किंवा कमी तेलात बनवलेले ऑम्लेट हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Boiled Egg Rule | Pudhari

बेसन चिल्ला हा कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि मसाल्यांसह मिसळून चण्याच्या पिठापासून बनवला जातो. त्यात प्रथिने आणि फायबर भरपूर असतात

ओट्स चिल्ला हे ओट पावडरपासून बनवले जाते, दही, मसाले आणि भाज्यांसह मिसळले जाते. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते जे पचनासाठी निरोगी मानले जाते आणि पोट जास्त काळ भरलेले ठेवते.

पारंपरिक भारतीय नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे, उपमा किंवा थालीपीठ खाऊ शकता.

poha breakfast

सफरचंद, पपई, पेरू किंवा टरबूज यांसारखी फळे खावीत. फळांचा रस पिण्यापेक्षा अख्खी फळे खाणे जास्त चांगले, कारण त्यात फायबर असते.

Fruits | Canva Photo

जरी पदार्थ आरोग्यदायी असले, तरी ते प्रमाणात खाणे गरजेचे आहे.