पुढारी वृत्तसेवा
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे, ज्यामध्ये लोक संपूर्ण 9 दिवसांचा उपवास करतात.
आहारतज्ज्ञ सांगतात की, तुम्ही उपवास सोडताना कोणते अन्न ग्रहण करता हे जास्त महत्त्वाचे आहे.
कारण, जास्त दिवस उपवास केल्याने पचनक्रिया मंदावते.
त्यामुळे उपवास सोडताना पदार्थांच्या निवडीमध्ये चूक झाली, तर त्या निष्काळजीपणामुळे पचन बिघडण्याची, तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
उपवास सोडल्यानंतर, कधीही मसालेदार आणि तिखट पदार्थ खाऊ नयेत.
दीर्घ उपवासानंतर आतड्यांचा आतील स्तर मऊ होतो.
अशा परिस्थितीत, मिरचीचा तिखटपणा अन्ननलिकेतून आतड्यांचा अंतर्गत स्तर जाळतो.
ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उपवास सोडल्यानंतर दही, ताक, लिंबू यासारखे आंबट पदार्थ टाळावेत.
आंबट पदार्थांमध्ये आम्लयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांच्या अस्तरांना नुकसान पोहोचवू शकतात.
बेसनसारखे पदार्थ टाळणे गरजेचे आहे. तसेच, गोड पदार्थही टाळावेत. उपवास सोडल्यानंतर, नेहमी सहज पचणारे अन्न खावे.