Heart attack: हार्ट अटॅक आल्यावर हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

समजा घरात कुणला हार्ट अटॅक आला तर सर्वात आधी काय करावे? असा तुम्हाला प्रश्न पडलाय का? कारण, पहिल्या काही मिनिटांमध्ये उचललेले योग्य पाऊल कधीकधी जीव वाचवू शकतो.

Heart Attack | pudhari

हार्ट अटॅकचे पहिलं लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना होणे. या वेदना डाव्या हात, मान किंवा जबड्यापर्यंत पसरू शकतात.

हार्ट अटॅकचा संशय येताच त्वरीत आपत्कालीन सेवेला फोन करा आणि हृदयविकाराच्या झटक्याची माहिती द्या. हृदयरोग तज्ञ असलेल्याच मोठ्या रुग्णालयात घेऊन जा.

मदतीसाठी फोन केल्यानंतर किंवा रुग्णालयात जात असताना, रुग्णाला रक्त पातळ करणारी गोळी (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) चावून त्वरित द्या. गोळी गिळण्याऐवजी चावल्यास तिचा परिणाम लवकर होतो.

रुग्णाला बसलेल्या किंवा ४५ अंशावर टेकलेल्या स्थितीत ठेवा (सरळ झोपवू नका). घट्ट कपडे सैल करा आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, रुग्णाला चालू देऊ नका.

रुग्ण बोलत आहे की नाही आणि त्याचा श्वास व्यवस्थित चालू आहे की नाही यावर सतत लक्ष ठेवा.

जर रुग्ण अचानक बेशुद्ध झाला, श्वास घेणे थांबले किंवा नाडी थांबली, तर ही कार्डिॲक अरेस्टची स्थिती असू शकते. अशा वेळी, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्वरित सीपीआर सुरू करा.

लवकरात लवकर रूग्णालयात पोहचण्याचा प्रयत्न करा.