पुढारी वृत्तसेवा
पांढरी दाढी हे सामान्यतः वाढत्या वयाच्या किंवा वृद्धत्वाच्या लक्षणांपैकी एक मानले जाते.
आजकाल तरूण मुलांचेही दाढीचे केस पांढरे दिसत आहेत. यामुळे, ते दाढी ठेवण्यास कचरतात.
जर तुमच्या शरीरात मेलेनिन या हार्मोनचे पुरेसे उत्पादन होत नसेल तर केस लवकर पांढरे होऊ शकतात.
निरोगी, संतुलित आणि पोषक आहाराचा अभावही दाढीचे केस पांढरे होण्याचे एक कारण आहे.
चिंता आणि तणाव हे देखील दाढीचे तसेच डोक्याचे केस लहान वयातच पांढरे होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
धूम्रपान आणि मद्यपान : यामुळे आपल्या शरीरातील पेशींना नुकसान होते. रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे केसांच्या कूपांपर्यंत पुरेसे पोषण न पोहोचल्याने केस गळतात.
जर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या दाढीला पाढरे केस येत असतील तर अनुवांशिकदृष्ट्या तुम्हालाही याचा सामना करावा लागू शकतो.
जर तुम्ही तुमच्या दाढीच्या वाढीसाठी किंवा त्वचेसाठी हानिकारक उत्पादने वापरत असाल तर त्यामुळे तुमची दाढीही पांढरी होऊ शकते.
ज्या लोकांना काही आजार आहेत आणि ते सतत औषधांचे सेवन करतात त्यांच्या दाढीचे केस अकाली पांढरे होतात.
तुमचा ताणतणाव कमी करा. सकस आणि पोषक आहार घ्या. पुरेशी आणि चांगली झोप घ्या.
केमिकल युक्त स्किनकेअर उत्पादने वापरणे टाळा. नियमित व्यायाम करा. मद्यपान आणि धूम्रपान टाळा.